अखेर “तिची” मृत्यूशी झुंज दहा वर्षांनी संपली

कणकवली माजी सभापती संजय शिरसाट यांना पत्नी शोक
दहा वर्षापूर्वी दुचाकी अपघातात झाल्या होत्या गंभीर जखमी
कणकवली तालुक्याचे माजी सभापती संजय शिरसाट यांच्या पत्नी सौ. समिधा शिरसाट यांचे गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी रात्री साकेडी वरचीवाडी येथे घरी निधन झाले. दहा वर्षांपूर्वी समिधा शिरसाट यांचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. या अपघातानंतर त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करत त्यानंतर मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर बरेच महिने उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. या अपघातानंतर त्या कोमात गेल्या होत्या. त्यानंतर गेली दहा वर्ष त्या तशाच स्थितीत होत्या. अखेर गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. अपघातापूर्वी साकेडी वरचीवाडी येथील अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या कार्यरत होत्या. गेली दहा वर्षे त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर निष्फळ ठरली. त्यांच्या पश्चात पती संजय शिरसाट, दोन मुलगे, दीर, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर साकेडी येथील स्मशानभूमी मध्ये आज शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.





