कणकवलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

तब्बल 20 हजार रुपये असलेले पैशांचे पाकीट केले परत

तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी संभाजी खाडे यांनी मानले आभार

कणकवली शहरातील रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसाच एक प्रामाणिकपणा प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांनी दाखवला असून कणकवली रेल्वे स्टेशनवर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या या रिक्षा चालकांना आज सकाळी कणकवलीत नरडवे रोड वरील महाडेश्वर हॉस्पिटल समोरील स्पीड ब्रेकर जवळ एक पैशाने भरलेले पाकीट पडलेले आढळले. हे पाकीट रिक्षाचालक गावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या पाकिटा मधील 20 हजार रोख रक्कम पाहिली व आतील ओळखपत्र पाहिले असता तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी खाडे यांचे ओळखपत्र त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी याबाबत कणकवलीतील रहिवासी असलेले व महसूल कर्मचारी अरुण जोगळे यांच्याशी संपर्क साधला व पाकिटात असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क देखील साधला व संभाजी खाडे यांना पाकी हरवल्यापासून काही वेळातच हे पाकीट पुन्हा परत केले. रिक्षाचालक गावडे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. संभाजी खाडे यांनी देखील या रिक्षा चालकांचे कौतुक केले असून त्यांना धन्यवाद दिले आहेत.

error: Content is protected !!