साकेडी गावच्या पोलीसपाटील पदी शैलेश जाधव यांची निवड

प्रांताधिकारी तथा निवड अधिकारी जगदीश कातकर यांनी केली नियुक्ती जाहीर

साकेडी गावच्या पोलीस पाटील पदी शैलेश बाळकृष्ण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले काही दिवस या पदाचा कार्यभार हुबरट पोलीस पाटील बाबु गुरव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. अनुसूचित जाती याकरिता हे पद राखीव होते. नुकत्याच झालेल्या नियुक्तीमध्ये शैलेश बाळकृष्ण जाधव हे नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांची निवड प्रांताधिकारी तथा निवड अधिकारी जगदीश कातकर यांनी जाहीर केली आहे. कणकवली पोलीस स्टेशन मधून श्री जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!