दारिस्ते वरची पटेलवाडी व दारिस्ते सुतारवाडी विश्वकर्मा भजन मंडळ ठरले भजन साहित्याचे मानकरी

बीडीओ व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साहित्याचे वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्वनिधितून लकी ड्रॉ पद्धतीने नंबर काढून ‌ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य देण्यात आले.त्यामध्ये या वर्षी दारिस्ते वरची पटेलवाडी भजन मंडळ व सुतार वाडी विश्वकर्मा भजन मंडळ या दोन भजन मंडळना कणकवली पंचायत समिती येथे भजनाचे साहित्य देण्यात आले त्या वेळी कणकवली पंचायत समिती गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, ग्रामसेवक शशिकांत तांबे, सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच, आणि दोन्ही भजन मंडळाचे कार्यकर्ते हेमंत सावंत, कृष्णा सावंत, महेश सावंत,अरूण सावंत,वंसत सावंत, मंगेश सुतार, नरहरी सुतार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही भजन मंडळांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे मनापासून आभार मानले. तसेच दोन्ही भजन मंडळांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!