कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात ५ लाख १० हजारांचा अब्रुनुकसानीचा दावा

माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती
कार्यकारी अभियंता गैरहजर असताना त्यांची सही कुणी केली
छत्रपतीं साठी वेळ पडल्यास 100 गुन्हे घेईन
सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी माझ्या गुन्हा दाखल करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्याकडे परवानगी पत्र दिले. छत्रपतींच्या पुतळ्याची दुर्घटना घडल्यानंतर पसार असताना त्यांनी 2 सप्टेंबर ला जावक क्रमांक घालून तयार केले . ते ड्युटीवर नसताना पत्रावर सही कोणी केली ? त्यांच्या पाठीमागे उपअभियंता बातुस्कर हे पसारांचे खेळ करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष सही न मारता टॅब वर सही केली असावी. परंतु मी अधिक्षक अभियंत्यांना विनंती करतो की, सर्वगोड यांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी. छत्रपती शिवरायांसाठी वेळ पडल्यास 100 गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचा माजी आ. परशुराम उपरकर यांनी दिला.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ,माहितीच्या अधिकारात 60 अर्ज केले आहेत. ही गोष्ट खरी आहे. मात्र , सर्वगोड यांनी कधीच कोणतीही माहिती दिली नाही. त्याविरुध्द राज्य माहीती अधिकाऱ्यांकडे 20 ते 25 अपिले दाखल केलेली आहेत. सर्वगोड यांनी रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरण कामाची अधिकार नसताना निविदा काढली आहे. अशाच अनेक कामांमध्ये त्यांनी घोळ केलेला आहे. या रेल्वे स्टेशन सुशोभिकरण निविदा काढताना पनवेल येथील ठेकेदाराच्या नावे काढली . मात्र , त्याचे काम श्री. शिरगांवकर यांनी केल्यामुळे त्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अशी टीका श्री. उपरकर यांनी केली.
पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करीत आहेत.सर्वगोड हे मंत्रालयाच्या कार्यालयात किती वेळ असतात,याची माहिती घेतली पाहिजे.मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता हे अधिकारी सर्वगोड यांना पाठीशी घालत आहेत.चुकीच्या पद्धतीने त्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. 2800 कोटी आणले असे सांगतात, त्या 2800 कोटीची कामे कुठे दिसताहेत? गणपतीत आजही सर्व रस्ते खड्डेमय आहेत.काम करायची कॅपॅसिटी नसलेल्या ठेकेदारांना सर्वगोड कामे देतात. नौदल यांच्याकडून दिलेल्या पत्रात पुतळा कोसळला त्या कामाची वर्क ऑर्डर मध्ये कोणतीही रक्कम नाही.देखभाल दुरुस्ती 3 महिने आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकामाचे पैसे असल्याने त्या कामाची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम ची आहे.याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे . असा इशारा श्री. उपरकर यांनी दिला.
कालच जिल्हा न्यायालयात 66/24 या नंबने सर्वगोड यांच्या विरोधात दावा दाखल केला आहे. 5 लाख 10 हजार रुपये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे.सर्वगोड यांची माहिती उच्च न्यायालयात पुरावे सादर केले जाणार आहे.किल्ल्याची बांधणी सीआरझेडची परवानगी न घेता काम केले. राजकोट किल्ला येथील छत्रपतींच्या पुतळ्याची 6 फुटाची परवानगी असताना 28 फूट कोणी केला? निविदेच्या तारखांमध्ये तफावत आहेत. त्याविरुध्द कोर्टात जाणार असल्याचा इशारा श्री. उपरकर यांनी दिला.
कणकवली प्रतिनिधी