संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कुडाळ न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश सौ अश्विनी बाचुळकर राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि मालवण येथील प्रसिद्ध उद्योजिका श्रमिती मेघा सावंत या प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच ॲड रूपाली कदम , ॲड.संजय रानडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही बी.झोडगे तसेच महिला विकास कक्षाचे सदस्य कॅप्टन डॉ.एस.टी आवटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर शरयू आसोलकर यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. तसेच आपल्या प्रास्ताविकामध्ये महिला विकास पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना दिवाणी न्यायाधीश बाचुळकर यांनी यांनी महिला दिनाच्या संदर्भात महिलांच्या गौरवशाली वाटचालीचा परामर्श घेतला. महिलांनी जीवनाची वाटचाल करताना आत्मभान सतत जागे ठेवले पाहिजे असे त्या म्हणाल्या. महिला उद्योजिका सौ मेघा सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमधून यशस्वी उद्योजिका म्हणून केलेली वाटचाल ओघवत्या शैलीमध्ये मांडली. संत राऊळ महाराज महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असल्याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता खंबीरपणे परिस्थितीला तोंड देत स्त्रियांनी आपले स्थान निर्माण केले पाहिजे. तेवढी शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच फक्त ती ओळखता यायला हवी त्यासाठी आपल्याला शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे असे आवाहन प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ॲड. रूपाली कदम यांनी यावेळी महिला विषयक कायद्यांची सविस्तर माहिती दिली तर ॲड.संजय रानडे यांनी कौटुंबिक हिंसाचार विरोधी असलेल्या कायद्याची तसेच विविध तरतुदींची उपस्थित यांना माहिती दिली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही बी झोडगे यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांनी केवळ नोकरी मिळण्याची संधी व शोधता स्वतःचा व्यवसाय उभारत पुढे गेले पाहिजे. असे सांगितले. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून न्यायाधीश सौ.अश्विनी बाचुळकर आणि उद्योजिका श्रीमती मेघा सावंत यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही बी.झोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिला विकास कक्षा तर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रकमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रोख रक्कमेची ही पारितोषिके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्ही.बी झोडगे यांनी पुरस्कृत केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. प्राची देसाई हिने केले तर कु.अपर्णा कुडाळकर हिने उपस्थितांचे आभार मानते या कार्यक्रमाला डॉ. ए एन लोखंडे डॉ. व्ही.जी भास्कर प्रा.जमदाडे डॉ.मंगेश जांबळे ,डॉ. एन पी कांबळे, डॉ.बी ए. तुपेरे प्रा. संतोष वालावलकर प्रा. प्रज्ञा सावंत ,प्रा. सोनाली आगंचेकर प्रा. स्वप्नजा चांदेकर, प्रा. सबा शहा प्रा. राजगुरू प्रा. सौ. निकम प्रा. कविता पालकर प्राध्यापिका प्रणाली गावडे,प्रा.सविता पिंगुळकर आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!