अहमदनगर येथील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांची चमकदार कामागिरी
अहमदनगर येथे सादर केली लक्षणीय योगासने.
कणकवली/प्रतिनिधी.
सिंधुदुर्ग योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत मानांकन प्राप्त करून जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.पेंडूर येथील कृतिका पंदारे,दूर्वा आकेरकर,युग पंदारे,ओमकार धुरी,रोहन गावडे तसेच आयडियल इंग्लिश स्कूल कणकवली येथील हर्षिता सावंत, कणकवली कॉलेज कणकवलीची मीरा नवरे,डॉन बॉस्को स्कूल ओरोस ची अस्मि राव,इंजीनियरिंग कॉलेज मालवण येथून निकिता लाड या विद्यार्थ्यांनी उत्तम आसनांचे सादरीकरण केले.या विद्यार्थ्यांसोबत जिल्ह्यातील कोच म्हणून श्री.प्रकाश कोचरेकर व सौ.श्वेता गावडे उपस्थित होते. यांचेही मोलाचे मार्गदर्शन या सर्व विद्यार्थ्यांना लाभले.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.वसुधा मोरे,कॉर्डिनेटर डॉ.तुळशीदास रावराणे,राष्ट्रीय कोच तसेच टीम मॅनेजर श्री.संजय भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.