पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या आंदोलनाला यश : आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने कास्ट व्हॅलिडिटी देण्याचे आदेश.

सरकारी सेवेत असलेल्या ठाकर समाज्यातील नोकरवर्गाला देखील कास्ट व्हॅलिडिटी चा मार्ग होणार मोकळा.

मुंबई येथील सभेत शिक्षणमंत्री मा.श्री.दीपक केसरकर आणि आमदार.नितेश राणे यांचा जिल्ह्यातील ठाकर समाज्यासाठी आक्रमक पवित्रा : पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर.

कणकवली/मयूर ठाकूर.

पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली आणि जिल्ह्यातील ठाकर समाज बांधव यांनी नुकतेच जिल्ह्यातील ओरोस येथे जातपडताळणीसादर्भात आमरण उपोषण केले होते.यामध्ये प्रामुख्याने सरकारी सेवेत असलेल्या नोकरवर्गाला कास्ट व्हॅलिडिटी मिळत नसलेल्या अडथळे निर्माण होत होते,तसेच समाज्यातील विद्यार्थ्यांना देखील कास्ट व्हॅलिडिटी नसल्या कारणामुळे ऍडमिशन ला अडथळे निर्माण होऊन त्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत होते.असे असताना जातपडताळणी समितीकडून विशेष सहकार्य मिळत नव्हते आणि कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यासाठी जिल्ह्यातील समाजबंधवांना अडचणी निर्माण होत होत्या.
वरील विषयांसंदर्भात नुकतेच पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीचे अध्यक्ष अमित ठाकूर आणि समाज्यातील काही जेष्ठ समजबांधव यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली नुकतेच आमरण उपोषण करण्यात आले होते.या उपोषणाला जिल्ह्यातील ठाकर समाज्यातील विद्यार्थी,सरकारी सेवेत असलेले कर्मचारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपोषणाची वरिष्ठ पातळीवर दाखल घेण्यात आली आणि तातडीने आदिवासी विकास मंत्रालय यांच्या सचिवांकडून तसेच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्फत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या या सभेत पंचक्रोशी ठाकर समाज,कणकवली चे अध्यक्ष श्री.अमित ठाकूर,श्री.मोहन रणसिंग,श्री.राजन रणसिंग,श्री.चंद्रकांत ठाकूर,श्री.भाई ठुंबरे,श्री.कैलास ठाकूर,श्री.अमित मराठे,श्री.विलास म्हसकर आदी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील ठाकर सामाज्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यासाठी पडताळणी समिती अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून आक्रमक पवित्रा घेतला. जिल्ह्यातील समाज बांधवांवर कास्ट व्हॅलिडिटी न देऊन त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि तो सहन केला जाणार नाही असे अधिकाऱ्यांना खडसावंत उपोषणास बसलेल्या विद्यार्थी आणि नोकरवर्गाला तातडीने कास्ट व्हॅलिडिटी देण्याचे आदेश दिले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील जिल्ह्यातील ठाकर बांधवांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आणि कास्ट व्हॅलिडिटी साठी पडताळणी समितीकडून येणारे अडथळे सुरवातीला समजून घेऊन पडताळणी समितीला धारेवर धरले.
ठाकर बांधवांनी फुकारलेले हे आंदोलन आणि नुकतीच झालेली बैठक ही यशस्वी झालेली असून विद्यार्थी आणि सेवेत असलेल्या नोकरवर्गाला कास्ट व्हॅलिडिटी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
आजच्या सभेला मंत्रालयाचे आदिवासींचे सचिव व अधिकारी ,आदिवासी संचालक( डायरेक्टर), संपूर्ण जात पडताळणी समिती, जिल्ह्यावरून संघटनेचे सचिव समीर ठाकूर,महेंद्र मस्के,किरण पालव आणि अन्य कार्यकर्ते ऑनलाईन कॉन्फरन्स द्वारा आजच्या सभेला हजर होते.

error: Content is protected !!