निखिल गुरव यांची युवासेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती

आम.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
खारेपाटण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते निखिल गुरव यांची आज युवासेना विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.आज दि. 19ऑगस्ट रोजी आम. वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र निखिल गुरव यांना देण्यात आले.हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच माजी खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत,युवासेना सचिव -वरूण सरदेसाई, जिल्हा संपर्क प्रमुख -अरुण दूधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार युवासेनेच्या खारेपाटण विभागप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल निखिल गुरव यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच युवासेना प्रमुखांचे प्रखर विचार जनतेपर्यंत पोहचवून संघटना व जनहित साधण्यासाठी खारेपाटण कार्यक्षेत्रात संघटना वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन, तसेच संघटनेचे जबाबदार पदाधिकारी म्हणून संघटनेच्या कामास वेळ देऊन शिवसैनिकांच्या संख्येत वाढ करून संघटनेची ताकद मजबूत करणार असल्याचे निखिल गुरव यांनी सांगितले.यावेळी आम. वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक, खारेपाटण जि. प. संपर्क प्रमुख -सतीश गुरव, उपतालुकाप्रमुख -महेश कोळसुलकर, तेजस राऊत, दिनेश खांडेकर आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण