हळवल मध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन

आदर्श व्यक्तिमत्व पुरस्काराचे होणार वितरण

कणकवली : शिवजयंती उत्सव मंडळ हळवल कणकवलीच्या वतीने 10 मार्च रोजी शिवजयंती उत्सवा च्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता शिवप्रतिमेची पूजा, त्यानंतर सत्यनारायण महापूजा, प्रसाद व आरती, रात्री 7 वाजता हरिपाठ, रात्री 8.30 वाजता सत्कार व आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार वितरण, रात्री 9 वाजता मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे यांच्या दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली / प्रतिनिधी

error: Content is protected !!