रक्त दर वाढीच्या विरोधात निवेदने देऊन शासनाला जाग आणा

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे सभासद परेश परुळेकर यांची मागणी
कणकवली : समाजाचे काही तरी देणे लागते या भावनेतून विविध उपक्रमानिमित्त अनेक जण रक्तदान शिबिराचे आयोजन करून जमा झालेले रक्त हे शासकीय ब्लड बँक मध्ये जमा करतात. आज पर्यंत मर्यादित असलेली ब्लड बॅग ची किंमत ही शासन स्तरावरून भरमसाठ प्रमाणात वाढ केली आहे. जी रक्कम गोर गरीब जनतेला न परवडणारी अशी आहे. त्यामुळे सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान च्या पदाधिकारी यांनी या लागू केलेल्या दर वाढीला विरोध म्हणून जिल्हाधिकरी,प्रत्येक तालुका तहसीलदार, आमदार,खासदार यांना एक निवेदन देण्याचे आवाहन सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे सभासद व कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर 9422373501 यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली