कणकवली नगरपंचायत च्या वतीने तिरंगा रॅली

प्रशासक जगदीश कातकर यांच्या सहीत मुख्याधिकारी परितोष कंकाळ हे देखील सहभागी

जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देश भक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 वा वर्धापन दिन अंतर्गत 09 ऑगस्ट, 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राज्यात विविध उपक्रम/ कार्यक्रम राबविण्याचे शासनाने निश्चित केलेले आहे. सदर उपक्रमांर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत विविध शिबीरे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याला अनुसरून आज मंगळवारी कणकवली नगरपंचायत कार्यालय ते नरडवे रोड रेल्वे स्टेशन येथे तिरंगा रॅली (मोटर सायकल रॅली) संपन्न झाली. या रॅलीस कणकवली नगरपंचायतीचे प्रशासक जगदीश कातकर, मुख्याधिकारी श्री.परितोष कंकाळ, कणकवली नगरपंचायतीचे ब्रँण्ड अ‍ॅम्बॅसिडर श्री.दिपक बेलवलकर, रोटरी क्लब सदस्य, बचत गट महिला, कणकवली नगरपंचायत अधिकारी / कर्मचारी व शहरातील बहुसंख्य नागरिक इत्यादी सर्व उपस्थित होते.
या दरम्‍यान कणकवली रेल्वे स्टेशन येथे तिरंगा शपथ घेण्‍यात आली. या रॅलीमध्‍ये भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा, जय जवान जय किसान या घोषणांनी देशभक्‍तीपर जनभावना निर्माण करण्‍यात आली. कणकवली नगरपंचायत कार्यालया समोर तिरंगा कॅनव्हास तयार करण्‍यात आला असून त्‍यावर नागरीकांनी स्वाक्षरी व घोषवाक्ये नोंदविली. नागरीकांनी आपल्‍या घरावरील राष्‍ट्रध्‍वजासोबत सेल्‍फी काढून किंवा कणकवली नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी सेल्‍फी पॉंईट तयार करण्‍यात आलेला असून याठिकाणी फोटो काढून harghartiranga.com या शासनाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर अपलोड करावा व ‘’घरोघरी तिरंगा’’ या उपक्रमामध्‍ये कणकवली शहरातील सर्व नागरिकांनी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उत्सफूर्तपणे सहभागी व्‍हावे असे आवाहन मुख्‍याधिकारी श्री.परितोष कंकाळ यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!