हळवल येथील दीपिका राणेंचा प्रामाणिकपणा
तब्बल पावणेदान लाखाची सो याची चेन केली परत
दीपिका राणेंचे होतेय सर्वच स्तरात कौतुक
कणकवली शहरातील रहिवासी राजाराम उर्फ प्रद्युम्ण मुंज यांची तब्बल एक लाख पंचांत्तर हजार किमतीची सोन्याची चैन 25 जुलै रोजी कणकवलीत गहाळ झाली होती ती हळवल महानभाटले वाडी येथील रहिवासी सौ दीपिका दिनेश राणे यांना सापडली होती. त्यानंतर सौ दीपिका व त्यांचे पती दिनेश राणे यांनी तातडीने हळवल येथील शिवा राणे व लवू परब यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंज यांची हरवलेली वस्तू व दीपिका राणे यांना सापडलेली वस्तू एकच असल्याची शहानीशा करत ती सोन्याची चैन आज राजाराम मुंज यांना सुपूर्त करण्यात आली. हळवल येथील दीपिका दिनेश राणे यांनी माणुसकी जपत प्रामाणिक पणे सोन्याची किमती असलेली वस्तू परत केली याबद्धल त्यांच्यावर हळवल गावातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. मुंज यांना दागिना सुपूर्त करताना हळवल येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सावंत, शिवा राणे, लवू परब, दिनेश राणे, कन्हय्या पारकर, प्रसाद अंधारी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी