भाजपा कणकवली तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची निवड

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पदाधिकारी निवडी जाहीर

संघटनात्मक बांधणीसाठी होणार फायदा

कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडल अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी माजी सभापती दिलीप तळेकर यांची निवड आज ओरोस येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यानी जाहीर केली. निवडीनंतर नुतन तालुकाध्यक्षांचे पुच्छगुच्छ देवून आ. नितेश राणे यांनी अभिनंदन केले. माजी सभापती दिलीप तळेकर यांनी पंचायत समितीत प्रशासन चांगल्याप्रकारे हाताळत तालुक्याच्या विकासाला चालना दिली होती. त्यांच्या निवडीमुळे संघटनात्मक बांधणीसाठी मोठी मदत होणार आहे.
ओरस येथील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात या निवडी जाहिर करण्यात आल्या . यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार अजित गोगटे , भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत , बाळ खडपे , माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार , सरचिटणीस महेश गुरव , शहराध्यक्ष अण्णा कोदे , संदीप सावंत , राजु हिर्लेकर , कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर , प्रज्वल वर्दम , पंढरी वायंगणकर , सुभाष मालंडकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
आपल्यावर भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ नेत्यांनी मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे , पालकमंत्री रविंद्र चव्हाण , आ. नितेश राणे , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्यावर विश्वास ठेवत तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत मला दिलेल्या ग्रामीण मंडल विभागातील सर्व गावांमध्ये चांगले मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया नुतन तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिली.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!