विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत गणेश मूर्तीची कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी बनविल्या अनेक देखण्या गणेश मूर्ती
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण सेवा योजना ‘ हरित सेना , व वसुंधरा योजना या विभांगांचा संयुक्त उपक्रम तसेच आनंददायीक शनिवार म्हणून प्रशालेत कला शिक्षक श्री प्रसाद राणे सर यांनी प्रशालेतील विद्यार्थांसाठी माती पासून (साडू माती ) गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशालेतील पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी उत्फूर्त पणे सहभाग घेऊन उत्तम अशा साडूच्या मूर्ती आकर्षक पणे तयार केल्या विद्यामंदिर प्रशालेत बालकलाकार भावी पिढीसाठी तयार व्हावेत अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे या उद्देशाने श्री प्रसाद राणे सरांनी मूर्तीचे प्रशिक्षण विद्यार्थांना देवून आदर्श घालून दिला बाल कलाकारानी साठ ते सत्तर गणेश मूर्ती तयार करून सुंदर प्रदर्शन भरून आदर्श निर्माण केला पर्यावरण पूरक मूर्ती वसुंधरा वाचविण्याचा महत्वपूर्ण आविष्कार संस्कृती वाचविण्यासाठी देवून विद्यामंदिर प्रशालेने फार मोठा आयाम संपूर्ण शाळेसाठी निर्माण केला याचा खूप मोठा अभिमान आहे. मुख्याध्यापक श्री पी. जे कांबळे सरांनी मूर्तीकला प्रदर्शनाची पहाणी करून सर्व बाल कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले या प्रदर्शनातून निष्णांत कलाकारांची मूर्ती निवडून सर्वच बाल कलाकारांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले . या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडन जेष्ठ शिक्षक अच्यूतराव वनवे सर श्री शेळके जे जे सर श्रीमती कदम आर आर सौ विद्या शिरसाठ ‘ श्री नेताजी जाधव श्री पृथ्वीराज बर्डे सर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी