पत्रकारांनी हात वर केले तर हरकत नाही वैभव नाईक ओरडणार नाही!

कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण लोकार्पण प्रसंगी पालकमंत्र्यांचा मिश्किल टोला

कणकवली रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्या दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाषणासाठी उभे राहिले असताना भाषणाच्या सुरुवातीलाच सर्वांनी हात वर करून भारत माता की जय चा जयघोष करण्याचे आवाहन केले. व हा जयघोष सुरू असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी “पत्रकारांनीही हात वर केले तर चालतील, वैभव नाईक ओरडणार नाही” असा मिश्किल टोला लगावला यावेळी एकच हशा पिकला.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!