गळाने मासे पकडण्यासाठी गेलेला युवक ना पत्ता

रामगड कुंभारवाडी येथील घटना


आचरा-अर्जुन बापर्डेकर
रामगड बेळणे येथील राहूल कृष्णा जिकमडे वय अंदाजे 19 हा गुरुवारी दुपारी 2.30च्या दरम्याने रामगड बेळणे येथील गडनदी किनारी नेहमी प्रमाणे गळाणे मासे पकडण्यासाठी गेला होता. तो गुरुवारी सायंकाळी उशिरा पर्यंत न आल्याने त्यांच्या आई, बहिण,स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध करुनही सापडून आला नाही. या बाबत त्याचे काका नरेंद्र जिकमडे यांनी आचरा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. शुक्रवारी एनडीआरएफ टिमकडूनही नदी पात्रात शोधाशोध घेऊन नही आढळून आला नाही. मालवण यैथील स्कूबा ड्रायविंग टीमला पाचारण करण्यात आले होते.
घटनास्थळी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहूल कृष्णा जिकमडे याला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. तो उशिरा पर्यंत मासे पकडण्यासाठी नदी किनारी थांबायचा.आठ दिवसापूर्वी च कणकवली येथील एका शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला होता.
नेहमी प्रमाणे गुरुवारी दुपारी २.३० वाजता गड नदीच्या किनारी गळाने मासे पकडायला गेला होता तो उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्याच्या बहिणीने आणिआईने नदी किनारी शोधाशोध केली पण तो आढळून आला नाही.मासे पकडण्याच्या ठिकाणी त्याचे कपडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळतात ग्रामस्थांनीही गुरुवारी सायंकाळी, शुक्रवारी सकाळी शोधाशोध केली पण शुक्रवार सकाळपर्यंत तो आढळून आला नसल्यामुळे याची खबर प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफ टीमला पाचारण करून त्यांच्याकडून साधारण अडीज किलोमिटर परीसरात शोधाशोध केला गैला होता.पण प्रयत्न व्यर्थ ठरले. शुक्रवारी सायंकाळी देवबाग यैथील वैभव बोटींग स्कूबा ला पाचारण करुन बेळणे नदी खाडी पात्रात शोध मोहीम राबवली जात होती.
घटनास्थळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार आचरा मंडल अधिकारी अजय परब, पोलीस कर्मचारी बबन पडवळ ,तांबे मनोज पुजारे, रामगड तलाठी यू एम वजराटकर ठाण मांडून होते.
शुक्रवारी उशिरापर्यंत राहुलचा थांगपत्ता लागला नव्हता. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली होती

error: Content is protected !!