वानिवडे गावचे सरपंच संयोगी घाडीयांचा सिंधुदुर्ग जिल्हा क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजाकडून सन्मान

15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून मिळाले आहे निमंत्रण
आचरा–अर्जुन बापर्डेकर
वानिवडे गावचे सरपंच संयोगी घाडी यांना 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे.त्यांच्या या सन्माना बद्दल सिंधुदुर्ग जिल्हा क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजाकडून वानिवडे येथे तिच्या घरी भेट देत जिल्हाध्यक्ष सुर्यकांत घाडी आणिमुंबई मंडळ कार्यकारी समिती उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर,यांच्या हस्ते तिचा सत्कार केला गेलाआणि तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या सोबत युवा समिती प्रमुख सिंधुदुर्ग विभाग उमेश घाडीगांवकर,खजिनदार सुनिल गांवकर,अर्जुन बापर्डेकर, दत्तगुरु गांवकर, सत्यवान गांवकर,तळवडे येथिलसंजय घाडी ,तसेच सुयोगी घाडी यांचे वडील,काका,भाऊ इतर कुटुंबीय उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील वानिवडे गावच्या सरपंच संयोगी घाडी यांना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. तिला मिळालेला सन्मान हा घाडीगांवकर समाजासाठी भूषणावह असल्याचे यावेळी सुर्यकांत घाडी यांनी सांगून उत्तरोत्तर अशीच प्रगती करुन समाजाचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.