मा.पालकमंत्री यांच्या हस्ते रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या मालवण येथील ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुश्रुषा,उपचार,पुनर्वसन, संशोधन (सिनियर सिटिझन मेडिकल ट्रीटमेंट ,रिहॅबिलिटेशन,रिसर्च) केंद्राचे लोकार्पण

मालवण – रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुश्रुषा,उपचार,पुनर्वसन, संशोधन (सिनियर सिटिझन मेडिकल ट्रीटमेंट ,रिहॅबिलिटेशन,रिसर्च) केंद्राचे लोकार्पण माननीय पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते उद्या दि.०८ ऑगस्ट रोजी ,दू. ३ वाजता, मालवण येथील संस्थेच्या नूतन वास्तू मध्ये होणार आहे.
सन २०११ साली रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर या संस्थेने कुडाळ, नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजोळ ही वृद्धापकाळात त्यांची वैद्यकीय काळजी सेवा देणारा उपक्रम सुरू केला . सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्धांचे वास्तव्य जास्त असून यांचा मृत्यू दरही इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. अंथरुणाला खि ळलेले रुग्ण ज्यांची काळजी पेशंटचे जे नातेवाईक घरी घेऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी देखील रेडी येथे ट्रस्ट स्थापन सुरू करून , त्यांच्यासाठी एक ट्रस्ट हॉस्पिटल संस्थेने चालू केले आहे. ज्यामध्ये दिलासा आणि विसावा असे दोन पूर्णपणे समर्पित ज्येष्ठ नागरिक उपचार कक्ष कार्यरत आहेत.
सध्या जिल्ह्यात वृद्धाश्रम आहेत, पण ज्येष्ठना उपचार देणारे कुठलेही जिर्याट्रिक मेडिकल सेंटर आपल्या जिल्ह्यात , रेडी हॉस्पिटल सोडल्यास नाही.
मालवण येथील संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये नूतन वास्तु मध्ये डॉक्टर रेडकर कुटुंबीय जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक जिर्याट्रिक सेंटर (ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र) सुरू करीत आहेत.
मालवण येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुभाष दिघे समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांच्या समस्या बाबत पालकमंत्री यांचे लक्ष वेधणार आहेत