आ.नितेश राणे खारेपाटण मध्ये जनतेच्या दारी
जनतेशी थेट संवाद साधत समस्या घेतल्या जाणून
खारेपाटण येथे पार पडलेल्या जनसंपर्क मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विधानसभा निवडूकीबाबत करण्यात आल्या सकारात्मक चर्चा
कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी आपल्या “तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत असणाऱ्या जनसंपर्क मोहिमे निम्मिताने खारेपाटण येथे गाव भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री कालभैरव मंदिर येथे आशीर्वाद घेत आम. नितेश राणे यांनी आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ केला. खारेपाटण मधील ग्रामस्थांशी नितेश राणे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांचा प्रचंड प्रतिसाद या जनसंपर्क मोहिमेसाठी पाहण्यास मिळाला. खारेपाटण व्यापारी संघटना,आरोग्य विभाग , विजवितरण, एसटी महामंडळ, रिक्षा संघटना, बचत गट महिला, शैक्षणिक विभाग अश्या सर्वच स्तरातील लोकं या जनसंपर्क मोहिमे साठी उपस्थित होती. प्रत्येक स्तरातील लोकांनी आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेल्या कामाबद्दल आभार मानले व आपल्याला हव्या असलेल्या काही सोयी सुविधाबाबत नितेश राणे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.येणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्शवभूमीवर देखील या जनसंपर्क मोहिमेत चर्चा करण्यात आली. मागच्या लोकसभा निवडनुकीत झालेल्या मतदान यांची चर्चा करून येणाऱ्या विधानसभा निवडूकीत सुद्धा आपल्या खारेपाटण वासियांनाचा निवडणुकीत सकारात्मक प्रतिसाद व पाठींबा असेल असा विश्वास आम राणे यांनी व्यक्त केला.खारेपाटण येथील पुराची समस्या, बाजरापेठ येथील रस्त्याची समस्या, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बस ची समस्या, खारेपाटण येथील ट्रॅफिक ची समस्या, शुकनदी तील गाळ उपसा ची मागणी, तसेच खारेपाटण बस स्टॅन्ड येथील जुने सौचालय पाडून रिक्षा वाल्याना जागा मोकळी करून देण्याची मागणी, खारेपाटण येथील रिंग रोड, तसेच संरक्षक भिंत, अश्या अनेक मागण्या व समस्यावर लोकांनी चर्चा केली.. या सर्व मागण्या व समस्या जाणून घेऊन आम. नितेश राणे यांनी लोकांना सांगितले की या सर्व तुमच्या समस्या व मागण्या आहेत त्यावर उपाय काढून सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. यावेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच -महेंद्र गुरव,तालुकाध्यक्ष -संतोष कानडे, जि. प. सदस्य -बाळा जठार,माजी सभापती -मनोज रावराणे,माजी सभापती -दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री,पं. स. सदस्या -तृप्ती मालवदे,माजी सरपंच -रमाकांत राऊत,व्यापारी असोशिशन चे अध्यक्ष -प्रांजल कुबल, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख -सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल,मधुकर गुरव,विजय देसाई, प्रवीण लोकरे,भाऊ राणे, श्री. कोरगावकर, नंदकिशोर कोरगावकर,रवींद्र शेट्ये, इस्माईल मुकादम, यशवंत रायबागकर,शेखर शिंदे,ग्रा. पं सदस्य -क्षितिजा धुमाळे, मनाली होनाळे, दक्षता सुतार, आस्थाली पवार, अमिषा गुरव, जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे,उज्वला चिके,Ctc -आस्था पाटणकर, बचतगट अध्यक्षा, खारेपाटण दूरक्षेत्र चे अंमलदार -उद्धव साबळे आदि सह अनेक महिला वर्ग व खारेपाटण येथील सर्व ग्रामस्थ या जनसंपर्क मोहिमे साठी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण