कणकवली, कुडाळ येथे गड किल्यावरील अतिक्रमणविरोधी मूकनिदर्शने

हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन

महाराजांच्या गड किल्यावरील अतिक्रमण आणि संवर्धन संदर्भात लोकांचे प्रबोधन आणि जागृती करण्यासाठी कणकवली आणि कुडाळ येथे रविवारी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमीनी हातात प्रबोधनात्मक फलक धरले होते.
कणकवली येथील पटवर्धन चौकात आणि कुडाळ येथील जिजामाता चौकात हे आंदोलन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समिती गेली 21 वर्षे समाजात जनप्रबोधन व धर्मजागृतीचे कार्य करीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत तसेच त्यांचे संवर्धन व्हावे याच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. ‘विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे’, ‘गडकिल्यानी राखले स्वराज्य, गड किल्यानी स्थापिले स्वराज्य’ असे विविध फलक कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. विशाळगड अतिक्रमणाचा विषय सध्या गाजतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. अनेक किल्यांची दुरवस्था झालेली आहे. हिंदु जनजागृती समिती या संदर्भात सातत्याने आवाज उठवत आहे. या अंतर्गत हे मूक निदर्शनं आंदोलन करण्यात आले.
यावेळी गौरीनंदन परब, निना कोळसुलकर, आशुतोष घाडी, विराज परब, अवधुत सावंत, अशोक जाधव, अनिल परब, उदय ओटवकर, जिगीषा म्हापसेकर, जयवंत सामंत, भास्कर काजरेकर, महादेव गावडे, विष्णू कदम, दर्शन म्हापसेकर, सुप्रिया सावंत, रमेश सावंत, सुनिल सावंत आदी उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!