चिंदर बाजार येथील घराची भिंत कोसळून नुकसान

आचरा प्रतिनिधी

सातत्याने पडणाऱ्या पावसाचा फटका चिंदर बाजार येथील श्रीम. सुषमा सुरेंद्र बांदिवडेकर यांच्या रहात्या बसला आहे या घराची भिंत गुरुवारी सायंकाळी कोसळली. बांदिवडेकर यांच्या घरात पाच व्यक्ती वास्तव्यास आहेत, भिंत कोसळताना आवाज होऊ लागल्याने घरातील माणसांनी घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामसेवक मंगेश साळसकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, समीर हडकर, आचरा पोलीस सुदेश तांबे आणि मनोज पुजारे दाखल होत पहाणी केली. तलाठी संतोष जाधव यांनी पाहणी करून नुकसाग्रस्त घराची पहाणी करून पंचायदी घातली.

error: Content is protected !!