तिलारी घाटात अखेर अवजड वाहनांना प्रशासनाकडून लगाम

दहा फुटापेक्षा उंच वाहनाना चाप

सतत अपघात होऊन चर्चेत राहणाऱ्या तिलारी घाटात अखेर अवजड वाहनांना प्रशासनाकडून लगाम घालण्यात आला आहे. प्रशासनाने तिलारी घाटाच्या पायथ्याशी व माथ्यावर ३ मीटर उंचीच्या लोखंडी कमान घातल्या आहेत. गोवा, दोडामार्ग, विजघर तिलारी घाट मार्गे बेळगाव व कोल्हापूर जवळचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक या घाटातून वाढली होती या संधीचा फायदा काही अवजड वाहनं धारकांनी घेऊन तिलारी घाटातून अवजड वाहने जाऊ शकत नाही असे असताना वाहने घालून अनेक ठिकाणी कठडे तोडले शिवाय अनेक अपघात घडले. तर वाहने अडकून घाट बंद होण्याच्या घटना घडल्या. यामुळे तिलारी घाटातून अवजड वाहनं बंद करावी अशी मागणी होत होती. बांधकाम विभाग चंदगड कोल्हापूर यांनी तसा प्रस्ताव पाठवला होता या नंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जून मध्ये अवजड वाहने बंदी घातली आणि घाटाच्या माथ्यावर पायथ्याशी अवजड वाहने जाऊ नये अशी कमान उभारावी अशी सूचना दिली होती या नुसार बांधकाम विभाग चंदगड यांनी घाटाच्या पायथ्याशी तसेच माथ्यावर कोदाळी जवळ मुख्य रस्त्यावर तीन मीटर कमान उभी केली आहे. यामुळे दहा फुटापेक्षा उंच वाहने यांना आता चाप लागला आहे. एस टी बसला देखील फटका बसला आहे. तिलारी घाटात गेल्या काही महिन्यात अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले कित्येक तास घाट बंद होऊन वाहन धारक प्रवासी यांना मोठा आस सहन करावा लागला. अनेक वाहनाचे नुकसान झाले. शिवाय बांधकाम विभाग यांनी घाटात लाखो रुपये खर्च करून बांधलेले संरक्षण कठडे तोडले होते. शिवाय तिलारी घाटात धोकादायक चढ उतार वळणे यामुळे अवजड वाहनं सुटणे कठीण शिवाय अवजड वाहनं धारकांना अंदाज नसल्याने अनेक अपघात झाले. होते यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जून ते ३१ आक्टोबर पर्यंत तिलारी घाटातून बंदी घातली आणि एस टी बस सेवा बंद झाली. तिलारी घाटात अवजड वाहने रोखण्यासाठी अखेर बांधकाम विभाग चंदगड यांनी तीन मीटर कमान उभारली आहे. बाजुला अवजड वाहने प्रवेश बंद असे फलक लावले आहेत. यामुळे आता अवजड वाहनांना लगाम लागला दहा फुटापेक्षा उंच वाहन जाणार नाही. शिवाय एस टी बस उंची बारा फुट आहे. यामुळे ती जावू शकणार आहे. प्रवाशाचे हाल होणार आहे. तेव्हा एस टी बस सुटली पाहिजे यासाठी बांधकाम विभाग यांनी कमान उंची बारा फुट करावी अशी मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!