जिल्ह्यात या कारणांसाठी केला मनाई आदेश लागु

सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकाऱ्यांचा निर्णय

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 6 मार्च 00.00 वाजल्यापासून दिनांक 20 मार्च 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.
जिल्ह्यात दिनांक 6 मार्च रोजी होळी उत्सव , दिनांक 7 मार्च रोजी धुलीवंदन, दिनांक 12 मार्च रोजी रंगपंचमी सण उत्सव पारंपारीक पध्दतीने साजरे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी होळी उत्सवात देवस्थानाचे धार्मिक कार्य करण्याच्या मानापानावरुन दोन गटामध्ये वाद होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. दिनांक 7 मार्च रोजी मुस्लिम धर्मियांची शब-ए-बरात व दिनांक 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) उत्सव साजरे होणार आहेत. तसेच जिल्ह्यात वैयक्तीक मागणीकरिता उपोषणे मार्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते.

        कोकण  विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी -मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता 12 वी उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा 2023 दिनांक 21 फेब्रुवारी ते  दिनांक 21 मार्च 2023 रोजीचे कालावधीत व इयत्ता 10 वी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा 2023 दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 रोजीच्या कालावधीत होणार आहे. जिल्ह्यामध्ये परिरक्षक केंद्र 9 इयत्ता 12 वी करीता 23 परीक्षा केंद्र व इयत्ता 10 वी करीता 41 परीक्षाकेंद्र अशी परीक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी परीक्षा केंद्राचे कामकाज सुव्यस्थित चालावे यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. त्यामुळे  या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

         कलम 37 (1) नुसार

Ø शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

Ø अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

Ø दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.

Ø व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

Ø सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

Ø सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3) नुसार

Ø सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.

Ø हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

       वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

सिंधुदुर्ग / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!