विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

विविध उपक्रमांचे करण्यात आले होते आयोजन

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शासनाच्या नविन शैक्षणिक धोरणांचा वर्धापन दिन या पार्श्वभूमीवर शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस अध्ययन अनुभूती व अध्यापन तसेच विविध शेक्षणिक साधानांतून अभ्यासपूरक उपक्रम पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आले . याच उपक्रमांचा एक भाग म्हणून हस्तलिखित संग्रह याचे भव्य प्रदर्शन व वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी विविध ग्रंथांचे प्रदर्शन भरवून प्रशाळेतील सर्व विद्यार्थांना वाचनाचे महत्व कथन करून सर्वांसाठी प्रदर्शन खुले करण्यात आले . शिक्षण सप्ताहाचा पहिलाच दिवस वाचन संस्कृती विकास करण्यासाठी आणि अध्ययन अनुभूती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरला विद्यार्थ्यासाठी शालेय परिमल हस्तलिखित वाचनाचा व ज्ञानाचा शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने खजिनाच प्राप्त झाला . जुण्या हस्तलिखित अंकांची संग्रहभेट कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी उत्तम पद्धतीने जोपासली होती योग्य आणि नेटके नियोजन करून या प्रदर्शनांची मांडणी केली आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाचा खजिनाच उलगडून दिला . ग्रंथपाल श्री एम डी पवार सरांनी ग्रंथांचे सुंदर प्रदर्शन भरवून वाचन कट्टा तयार केला पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वाचनाचा आस्वाद भरभरून घेतला . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे यांनी शिक्षण सप्ताहाचा पहिल्या दिवसाच्या उपक्रमाचे उद्गाटन करून वाचन संस्कृतीचे महत्त्व विषद केले व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या सौ हरमलकर मॅडम यांनी या उपक्रमाची उद्दिष्ट कथन करून शुभेच्छा दिल्या . या उक्रमाला पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम श्री वणवे सर श्री कदम एस एल सर श्री शेळके जे जे सर व विद्यार्थी उपस्थित होते .

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!