कलमठ मधील गीरकर कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्या कडून सहकार्य

झाडं पडून झाले होते घराचे नुकसान
कलमठ खालची कुंभारवाडी येथील विजय गिरकर यांच्या घरावर वादळी पावसाने झाड पडून घराचे नुकसान झाले. गिरकर कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्याकडून घर दुरुस्ती साठी लागणारे सिमेंट पत्रे देण्यात आले. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सरपंच संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सर्वेश दळवी,महेश लाड, दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, गुरू वर्देकर, मिलिंद चिंदरकर ,तेजस लोकरे,समर्थ कोरगावकर उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली