युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित रत्नागिरी जिल्हा STS-2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

दीड लाखाची रोख बक्षिसे,शैक्षणिक टॅब बक्षिसे देऊन गुणवंतांचा सन्मान

युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कारांचे देखील करण्यात आले वितरण

रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी माध्यमिक पतपेढी रत्नागिरी, साळवी स्टॉप येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टलेंट सर्च STS -2024 या परीक्षा करण्यात आला होता. यावेळी २०५ गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि आकर्षक भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
तसेच युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक विभागातून श्री महेश विश्राम नवेले, प्राथमिक शाळा रनपार ता रत्नागिरी व माध्यमिक विभागातून श्री राजेंद्र हरीशचंद्र वारे, मुख्याध्यापक गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावार्डे ता चिपळूण यांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर युवा संदेश प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत, श्री संजय सावंत,लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिपक नागवेकर, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दीपक माळी, शिक्षक समितीचे उपाध्यक्ष अनाजी मासये, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश काजवे, संचालक विजय खांडेकर, विशाल घोलप, मनिष देसाई, सौ.विभा बाणे, सौ.विमल चव्हाण,
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिंधुरत्न परीक्षा जिल्हा समन्वयक श्रीधर दळवी, उमेश केसरकर, सुहास वाडेकर, , संतोष देवळेकर, रघुनाथ काकये, संदीप मोरे, श्रीम.राजवाडे, हेमंत ऐवळे, राजेंद्र खेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली
पुढील परीक्षा रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून या वर्षापासून ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी जाहिर केले.
अधिक माहितीसाठी श्री श्रीधर दळवी 9284185353 आणि श्री उमेश केसरकर 7745823992 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन STS परिवारातर्फे करण्यात आले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!