महायुतीमध्ये सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावा!

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणीत एकमुखी ठराव

मुख्यमंत्री माझी बहीण योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करा

जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचना

सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळावा असा एकमुखी ठराव कार्यकारणी बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक यांनी दिली आहे. दरम्यान हा ठराव आपण वरिष्ठांकडे पाठवणार असून, वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणारं नाही याची देखील आम्ही काळजी घेऊ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सावंतवाडी येथे घेण्यात आली या बैठकीत श्री नाईक यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोचवावी या उद्देशाने आज मी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून त्यासाठी अजित पवार गटाच्या माध्यमातून सर्व तालुक्यात जनजागृती कॅम्प आयोजित करणार आहे. त्या माध्यमातून आम्ही महिलांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ कसा मिळतील यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचं श्री नाईक यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आपल्या जिल्ह्यात सव्वा दोन लाख महिला पात्र आहेत. मात्र आतापर्यंत 20 हजार फॉर्म आलेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी आमचे प्रयत्न असणे असून तसेच काय अटी जरी त्यात असतील ते देखील शिथिल करण्याचं काम सुरू असल्याचे देखील महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आम्हाला यावेळी सांगितले. त्यामुळे लवकरच त्या देखील अडचणी दूर होतील असा विश्वास आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस एम. के.गावडे,प्रदेश चिटणीस सुरेश गवस,जिल्हा उपाध्यक्ष एम ङी सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, व्ही.जे. एन.टी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष आशिष कदम, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर,वैभव वाडी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, देवगङ तालुकाध्यक्ष रशीद खान, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सत्यवान गवस,कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर चिटणीस गणेश चौगुले, विशाल पेडणेकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे,अल्पसंख्याक प्रदेश महा सचिव शफीक खान प्रांतिक सदस्य सत्यजित देशमुख, जिल्हा प्रतिनिधी गुरुदत्त कामत,डॉ. तुषार भोसले, श्री देशमुख, तालुका सरचिटणीस दीपक देसाई,तालुका उपाध्यक्ष मेघेंन देसाई,महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, महिला शहर अध्यक्ष रंजना निर्मळ, जिल्हा सचिव विलास पावसकर, योगेश हेरेकर ,रोहण परब, प्रभाकर गावकर् , आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर सिंधुदुर्ग

error: Content is protected !!