ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत

नागवे प्राथमिक शाळेमध्ये मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट वतीने पुस्तके प्रदान

नागवे पूर्ण प्राथमिक मराठी शाळेमध्ये मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सरस्वती गंगाराम हुले हिच्या स्मरणार्थ वाढीव पुस्तके प्रदान करण्यात आली. त्यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जयप्रकाश सावंत, मुख्याध्यापिका सौ मेस्त्री, मुरकर गुरूजी चारिटेबल ट्रस्ट चे जेष्ठ संचालक निवृत्त मुख्याध्यापक विजय पारकर, सेवानिवृत्त रेल्वे पोलिस अधिकारी सुधाकर हुले, शाळेतील शिक्षक कोचरेकर गुरूजी, तायशेटे, चोडणकर आणि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते , प्रा दिवाकर मुरकर म्हणाले या स्पर्धा परीक्षा ग्रंथालयातून दर्जेदार शिक्षण घेवून एक दोन विद्यार्थी पुढे शासकिय अधिकारी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

error: Content is protected !!