प्रयास- सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांची गोपुरी आश्रमाला भेट

गोपुरी आश्रमाच्या कामाबद्दल व्यक्त केले समाधान

सद्य काळात विचार आणि तत्वे आबाधित राखून काम करणाऱ्या संस्थांचे प्रमाण घटत चालले असताना कोकणचे गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांचा तळागाळातील माणसाच्या उन्नतीचा विचार घेऊन युवा मंडळी कार्यरत आहेत ही भविष्याकरिता अत्यंत समाधानाची बाब आहे. असे भावोद्गार प्रयास- सेवांकुर संस्था अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी काढले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कॅन्सर’ आजारा संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी ते आले होते. आज त्यांनी आवर्जून गोपुरी आश्रमाला भेट दिली. गोपुरी आश्रमाच्या कामा संदर्भात माहिती घेतली. यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सहसचिव संदीप सावंत, संचालिका अर्पिता मुंबरकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शामिता बिरमोळे आणि सावजी यांचे सहकारी उपस्थित होते.
सावजी पुढे म्हणाले की आज मानवतेचे तत्त्व आणि तत्त्वनिष्ठ विचारांच्या कृतीसाठी युवा वर्गाने पुढे यायला हवे. युवा पिढीच्या अस्तित्वावर सक्षम समाजाची धुरा अवलंबून आहे. याकरिता गोपुरी आश्रमासारख्या संस्था जिवंत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे, माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठीचे विचार भावी पिढी समोर ठेवणे ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. यात गोपुरी आश्रमाचा सक्रिय सहभाग आहे याचा मला विशेष आनंद वाटत आहे असेही डॉ. सावजी म्हणाले.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!