अतुल रावराणे यांना सौदेबाजी व भागीदारीची भाषा चांगली समजते!

आमदार नितेश राणे यांचा अतुल रावराणे यांना खोचक टोला

काळ्या मांजरासारखे आडवे येऊ नका

 आम्ही केलेल्या करूळ घाट पाहणी दौऱ्यानंतर अपेक्षेप्रमाणे उबाठाचे पावसाळी बेडूक डरावडराव करायला लागले आहेत. त्यातलेच एक अतुल रावराणे नावाचे महाशय आहेत. अशी सडकून टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
या अतुल रावराणेंना भागीदारी व सौदेबाजीची भाषा चांगलीच कळते. 2019 ला स्वतःच्या हक्काची विधानसभेची तिकीट भागीदार आणि सौदीबाजी मुळेच दुसऱ्याला विकली होती का ? त्याचे उत्तर त्यांनी अगोदर द्यावे. मगच त्यांनी आमच्यावर बोलावे. असे आमदार नितेश राणे यांनी अतुल रावराणे यांना सुनावले आहे.
अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. रावराणे हे तर मातोश्रीच्या अतिशय जवळचे होते. तेव्हा ते घाटासाठी निधी आणू शकले नाहीत. यांचा माजी खासदार राऊत हे घाटासाठी दमडीचा निधी देऊ शकले नाहीत. आमच्या महायुतीच्या सरकारने अडीचशे कोटी निधी घाट रुंदीकरणासाठी दिला आहे. तो खर्चही होत आहे. त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार या रावराणे महाशयांना नाही. विकास जमत नसेल, निधी आणायला जमत नसेल, तर निदान काळ्या मांजरासारखे आडवे येऊ नका असे आमदार नितेश राणे यांनी अतुल रावराणे यांना सुनावले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!