एस एम जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

एस एम जुनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या कै. सदानंद पारकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव श्री डी. एम. नलावडे, प्राचार्य श्री.जी. एन. बोडके उपप्राचार्य श्री.आर.एल. प्रधान, पर्यवेक्षक श्री. जी.ए कदम व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री कदम सर यांनी शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांना एस.एम. च्या यशाची परंपरा अविरत ठेवण्यासाठी तुमची जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले.श्री प्रधान सर यांनी कोणतेही क्षेत्र निवडा पण त्याची निश्चिती आजच करून त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा सल्ला दिला. तर प्राचार्य बोडके सर यांनी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज एकत्र असल्याकारणाने शिस्तीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याच बरोबर त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
सचिव नलावडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी, करियर निवड, आई-वडिलांची स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी धडपड याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी.डी. हिर्लेकर व आभार सौ. एम. आर. पाटील यांनी मानले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण