कासार्डे मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची आज निवडणूक

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची आज निवडणूक संपन्न होतं असून कासार्डे मतदान केंद्रावर शांततेत निवडणुक पार पडत आहे.खारेपाटण विभाग, फोंडा विभाग, जाणवली विभागातील मतदारांचे मतदान कासार्डे केंद्रावर होतं आहे.
बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे.. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३४ मतदान केंद्रावर पदवीधर मतदान होतं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८ हजार ५५१ मतदारांची अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात मतदार संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्र ३१ इतकी निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी १८२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत.चोख पोलीस बंदोबस्तात ही निवडणूक पार पडत आहेत. कासार्डेसह प्रत्येक मतदान केंद्रावर महायुती व महाविकास अघाडीचे बुथ आहेत.या मतदारसंघातून एकूण १३ उमेदवार रिंगणात असून त्याचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रामुख्याने महायुतीचे निरंजन डावखरे विरूद्ध महाविकास अघाडीचे रमेश किर याच्यात मुख्य लढत दिसून येत आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!