“आयडियल स्पेशल स्कूल” चे उद्घाटन दिमाखात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर.

नव दिव्यांग फाउंडेशन मुंबई आणि ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल यांच्या वतीने गतिमंद, दिव्यांग ,स्वमग्न , मुलांसाठीच्या आयडियल स्पेशल स्कूल चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
अशा प्रकारच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या शाळेचे उद्घाटन नव दिव्यांग फाउंडेशनचे श्री.संजय मुठ्ठा सर ,तसेच श्री.गोपाळ भागवत सर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.गेली दोन वर्षे आयडियल इंग्लिश स्कूल दींव्यांग मुलांसाठी संसाधन केंद्र चालवत आहे ,विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या विशेष प्रगतीने नुकतेच संसाधन केंद्राचे शाळेत रूपांतर झाले आहे. असे उदगार मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री.संजय मुथा सर,गोपाळ भागवत सर, श्रीकांत सर ( पत्रकार) निशा पटेल मॅडम (सामाजिक कार्यकर्त्या ) श्री. पंढरी जाधव (जिल्हा संघटक नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था)
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री .बुलंद पटेल ,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,संचालिका डॉ.हेमा तायशेटे मॅडम ,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वैष्णवी मोर्वेकर मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्पेशल स्कूल चे श्री पुरुषोत्तम पाताडे सर ,सौ मंजिरी घेवारी मॅडम, श्री भालचंद्र चव्हाण सर,सौ. मीना शिंगाडे मॅडम ,यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत पाटकर सर यांनी केले

error: Content is protected !!