नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत महावितरणकडून अद्यावतीकरणाची कामे लागली मार्गी

कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडीत यांच्या पाठपुराव्याला आले यश ; ग्राहकांच्या समस्या सोडवितानाच मान्सुनची तयारी पुर्ण

कणकवली तालुक्यातील महावितरण कंपनीच्या नांदगाव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या गावांमध्ये वीज समस्या सोडविण्यासाठी विशेष कामगिरी बजावण्यात आली आहे. त्यामध्ये असलदे उगवतीवाडी ,दिवानसानेवाडी , नांदगाव मुख्य नळयोजना याठिकाणी 100 केव्हीए चे ट्रान्सफार्मर नव्याने बसविण्यात आले. उच्च व लघूदाब असलेल्या वाहीनींवरील 30 गंजलेले पोल बदलण्यात आले. त्याचबरोबर वीज सुरक्षितेच्या दृष्टीने स्पेसर ( गार्ड वायर ) 1200 ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे नांदगाव विभागात वीज महावितरणने केलेले अद्यावतीकरण ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडीत यांनी वरीष्ठ कार्यालयात केलेला पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणच्या नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणा-या गावांमध्ये मान्सुन दाखल होण्यापूर्वी आवश्यक ती उपाययोजना पुर्ण करण्यात आलेले आहेत. वीज तारांवरील फांद्या छाटणे, वीज दुरूस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात गावांचा वीज पुरवठा ठप्प होणार नाही अशी काळजी घेतली गेली आहे. एबी स्वीच उच्च दाब वाहीनी मध्येही चांगले काम करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने महावितरणे अधिकारी व कर्मचा-यांना चांगले काम केले आहे. त्याबद्दल ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महावितरण कडून ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कामांना लागणारी मंजुरी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली. त्यामुळे या भागातील ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. असलदे गावातील कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे काम महावितरणने केले आहे. त्यामध्ये असलदे उगवतीवाडी , डामरेवाडी , दिवानसानेवाडी या ठिकाणची विद्युत समस्या सोडविण्याचे काम महावितरण्याच्या माध्यमातून करण्यात आले आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!