शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी रमेश हरमलकर

जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिले नियुक्ती पत्र

शिवसेना वाढवणार – श्री. हरमलकर

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात रमेश हरमलकर यांना दिले. हरमलकर यांची निवड, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या कुडाळ तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास यावेळी रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित शिवसेना कुडाळ तालुका संघटक रमेश विनायक हरमलकर यांनी मीडियाशी बोलताना असे सांगितले की, मी जुना बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मला चांगलेच माहित आहे शिवसेना पक्ष वाढीसाठी काय काय करावे लागते. शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्व पदाधिकारी यांना घेऊन तालुक्यातील अनेक पक्ष प्रवेश आपण लवकरच घेणार आहोत,असे हरमलकर यांनी पद मिळाल्यानंतर कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात मिडियाशी बोलताना सांगितले.
रमेश हरमलकर यांना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देते वेळी शिवसेना कार्यालयात शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर , शिवसेना तालुका प्रमुख योगेश तुळसकर , शिवसेना तालुका प्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड. यशवर्धन राणे , पावशी शिवसेना विभाग प्रमुख जयदीप तुळसकर, समील जळवी, धर्मा सावंत अन्य उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!