ऋतुजा रवींद्र परब हिचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्कार

दहावीच्या परीक्षेत शिवडाव हायस्कूलमध्ये आली प्रथम

हळवल चे माजी सरपंच रविंद्र परब यांची कन्या कु.ऋतुजा परब हिने पंचक्रोशीत तसेच शिवडाव हायस्कूल मध्ये SSC मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच हळवल गावचे नाव मोठे केले.त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आला. त्यावेळी उपतालुकाप्रमुख श्री राजू राणे,युवासेना विभागप्रमुख रोहित राणे,शाखाप्रमुख अनंत राणे,मा.ग्रा.प.सदस्य प्रभाकर चव्हाण,विठोबा ठाकूर,रवी परब,राजन तांबे व शिवसैनिक आदि उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!