दहावीच्या परीक्षेत करून हायस्कूल चा निकाल 98.24 टक्के

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल ९८.२४ टक्के लागला आहे. या परीक्षेकरिता हायस्कूल मधून एकूण 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तन्वी संतोष पारकर हिने 96 टक्के गुण मिळवले. तर परी रमाकांत पाटील हिने 93.60%, तन्वी भिमराव प्रभावळकर हिने 93.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर संस्थाचालक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.