दहावी परीक्षेत नारीग्रे हायस्कूलचे शंभर टक्के यश

देवगड तालुक्यातील एस .बी .राणे हायस्कूल नारिंग्रे या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मृण्मयी राजकुमार भावे हिने 93.80टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला. सुरभी सुनील बापट हिने 85 टक्के गुणमिळवून द्वितीय क्रमांक, तर वरून आशिष राणे याने 83.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. सात विद्यार्थी विशेष प्राविण्‍याने ,12 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, सात विद्यार्थी द्वितीय श्रेणी व दोन विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे 24 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. शिक्षण संस्थेचे सचिव व्ही. डी .राणे व संस्था संचालक अरबी राणे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!