पिंगुळीतील युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील निलेश मंगेश मोर्ये (वय 42) या युवकाने गुरुवारी सायकाळी गळफास लावून आत्महत्या केली
निलेश मोर्ये हा काल सायंकाळी घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतर असणाऱ्या खोडदेश्वर या ठिकाणी आपली मोटर सायकल घेऊन गेला होता. त्याच्या हातात दोरी होती. त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याने झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले. काही वेळाने घटनास्थळी त्याची पत्नी व घरातील माणसे गेली. ही घटना आजूबाजुला समजताच सर्वांनी धाव घेतली.
याबाबत पोलीसाना माहिती दिल्यानंतर रात्री पंचनामा करून उशीर झाल्याने मृतदेह ओरोस शवागृहात ठेवण्यात आला. आज सकाळी शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे मोर्ये पालकर कुटूबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नीलेश हा सुतारकाम करायचा. चागला क्रिकेटपटू होता. त्याच्या मागे पत्नी, वडील, मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे अंगणवाडी सेविका स्वाती पालकर-मोर्ये यांचे ते पती तर पिंगुळी ग्रामपंचायत माजी सरपंच निर्मला पालकर-मोर्ये यांचे ते दिर होते आज शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!