सीएनजी किटमध्ये मिळणार १५ हजाराची सवलत
एमएनजीएलकडून विशेष ऑफर
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील सीएनजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून, तीन चाकी आणि छोट्या वाहनांमध्ये सीएनजी कीट बसवण्यासाठी एकूण खर्चापैकी तब्बल १५ हजारांची सवलत देण्यात येणार आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले आहे.
पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता; सीएनजीवर वाहने कार्यान्वित केल्यास त्याचा फायदा होतो, याची जाणीव वाहन चालकांना होत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीवरील वाहने जास्त मायलेज देतात. त्यामुळे इंधनाची बचत होते. शिवाय, पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने पैशांचीही बचत होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहने ५० टक्के जास्त फायदेशीर आहेत. अनेक वाहनधारकांचा आपल्या वाहनांमध्ये सीएनजी कीट बसवण्याकडे कल वाढला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एमएनजीएलने पुढाकार घेतला आहे.
एमएनजीएलने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी तीन चाकी आणि छोट्या मालवाहू वाहनधारकांसाठी विशेष सवलत जाहीर केली असून; या अंतर्गत तीन चाकी आणि छोट्या मालवाहू वाहनधारकांना आपल्या वाहनांमध्ये सीएनजी कीट बसवण्यासाठी एकूण खर्चापैकी १५ हजारांची सवलत देण्याचे जाहीर केले आहे. एमएनजीएलची ही सवलत १५ जुलै २०२४ पर्यंत लागू राहणार असून; याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एमएनजीएलने केले आहे. अधिक माहितीसाठी तथा नियम व अटींसाठी योजनेचे समन्वयक (scheme co-ordinator) राहुल कुलपे 9890743547 किंवा एमएनजीएलचे कुडाळ कार्यालय 7588090505 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.