कुडाळात कापड दुकानाच्या गोडावूनला आग

वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला
धोका टळला पण लाखो रुपयांचे नुकसान
प्रतिनिधी । कुडाळ : शहरातील ओटवणेकर तिठा येथील वामन शंकर पाटणकर यांचे कापड दुकान असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आज शुक्रवारी सायंकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास आग लागली. अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येऊ लागल्याने परिसरातील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. पण अग्निशमन दलाच्या बंबाने वेळीच धाव घेऊन आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.
कुडाळ बाजारपेठेत ओटवणेकर तिठा या गजबजलेल्या ठिकाणी हे कापड दुकान आहे. परिसरात एकमेकांना लागून दुकाने आहेत. पाटणकर यांच्या कापड दुकानाचे गोडाऊन तिसऱ्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावर कापड दुकान आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोट आतून बाहेर पडू लागले, तेव्हा परिसरातील व्यापारी व्यवसायिकांनी ही आग बघितल्यावर आग विझवण्यासाठी धावपळ केली. अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आग गोडाऊन मध्ये पसरली. बाहेर आगीचे धुराचे लोट पसरू लागले. कुडाळ एमआयडीसीचा अग्निशमन बंब गाडी तात्काळ घटनास्थळी आला. आणि आग विजवण्यास सुरुवात केली.. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वेळीच आग विझवण्यात आल्याने आसपासची घरे दुकाने बचावली. त्यातच पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे आग मोठी पसरली नाही यात लाखो रुपयांची नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे कुडाळ नगरपंचायतचा अग्निशामक बंब मात्र एक तासाने पोचला. वेंगुर्ले येथूनही अग्निशामक बंब मागविण्यात आला होता. .
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ