जानवली अपघातात अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाला जामीन मंजूर
आरोपी तर्फे ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
संशयित आरोपीला पुणे येथून केली होती अटक
दिनांक १७ मे रोजी जानवली येथील मुंबई गोवा महामार्गावरून चालणारे पादचारी अनिल कदम याना अज्ञात कारने जोरदार धडक दिली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेला. सदर घटने बाबत कदम यांच्या भावाने अज्ञात कारचालकाविरुद्ध फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार चालकाविरुद्ध भा. द. वी. कलम ३०४(अ), २८९,३३७,३३८ व मोटर व्हेहिकल एक्त कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.
अखेर कणकवली पोलिसांनी दिनांक २३ मे रोजी निगडी – पुणे येथून कार सहित संशयित आरोपी ओंकार दशरथ कोरडे (पुणे) याला अटक केली. पोलिसांनी आरोपीस कुडाळ येथील प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांचे कोर्टात हजर करुन आरोपीची २ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत आरोपीचा २० हजार रुपये रक्कमेच्या सशर्थ जामीनावर मुक्तता केली.
साक्षीदारांवर दबाव आणू नये व तपासकामात अडथळा अणू नये तसेच पोलिसांना तपासकामात सहकार्य करावे अशा अटीवर आरोपीस जामीन मंजूर करणेत आला.
दिगंबर वालावलकर कणकवली