एक तासापेक्षा जास्त काळ साकेडी रेल्वे फाटक बंद

कोकण रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना त्रास
सेफ्टी ऑडिट दरम्यान डागडुजी करूनही रेल्वे फटकाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर
कोकण रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा त्रास साकेडी सह अन्य ग्रामस्थांना बसला असून आज मंगळवारी सकाळपासून जवळपास गेले तासभराहून अधिक काळ साकेडी रेल्वे फाटक वायररोप तुटल्याने बंद झाल्याने लोकांचा खोळंबा झाला. तसेच या वेळेत रेशन दुकानावर आलेल्या ग्रामस्थांना देखील ताटकळत रेल्वे फाटक बंद असल्याने थांबावे लागले. तांत्रिक कारणामुळे या रेल्वे फटकात बिघाड झाल्याचे कारण समोर देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सेफ्टी ऑडिट करता रेल्वे फाटकाची डागडूजी व आसपासच्या भागाची साफसफाई करण्यात आली. मात्र या महत्त्वाच्या वायर रोप ची देखभाल का झाली नाही? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. सुमारे तासभराहून अधिक काळ होऊन देखील रेल्वे फाटक उघडले नसल्याने नागरिकांना अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. मात्र कोकण रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक व ग्रामस्थांना बसला. दरम्यान तासभराहून अधिक काळ हे फाटक बंद राहिल्याने अनेक ग्रामस्थांना जानवली, करूळ सह अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागल्याने वाहनचालक व ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान एक महिन्यापूर्वीच इलेक्ट्रिक रेल्वे फटका चे काम करण्यात आले. मात्र हे इलेक्ट्रिक फाटक कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून या इलेक्ट्रिक फाटक न करण्याकडे होणाऱ्या दुर्लक्ष यामुळे सुद्धा हा त्रास अजून झाला.