अखेर साकेडीच्या पुलाची “ती” संरक्षण भिंत लवकरात पूर्ण होणार!

ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी वेधले होते लक्ष
कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करत दिले आदेश
हुंबरट साकेडी रस्त्यावर तानेकोंडीचा व्हाळ या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या कामात एका बाजूच्या संरक्षण भिंतीचा कठडा कमी असल्याने येथे अपघाताची भीती निर्माण झाली होती. मात्र याबाबत नुकतेच कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी लक्ष वेधल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत श्री सर्वगोड यांनी नुकतीच या ठिकाणी पाहणी केली. व या पुलाच्या साकेडी च्या बाजूच्या संरक्षण भिंतीचे काम तात्काळ सुरू करा त्याकरिता लागणारा निधी देण्याचे आश्वासन श्री सर्वगोड यांनी दिले. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या जोडणाऱ्या रस्त्यांची कामे सध्या पूर्ण करण्यात आली. मात्र मूळ पुला च्या जागे च्या बाजूला नवीन पूल केल्याने साकेडी च्या बाजूचा रस्ता या पुलाला जोडताना एका बाजूने अरुंद बनला होता. त्यामुळे येथे संरक्षण भिंत करून रस्त्याची रुंदी वाढवण्याची गरज होती. अन्यथा या बाजूने वाहन रस्त्याच्या खाली जात अपघात घडण्याची भीती होती. सदरचे काम हे अंदाजपत्रकात नसल्याने ठेकेदाराकडून काम करण्याचा अडचण निर्माण होत होती. ही बाब श्री. वालावलकर यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. या पाहणी दरम्यान साकेडी सोसायटीचे संचालक राजु सदवडेकर, ठेकेदार अनिल पवार व अन्य उपस्थित होते. कार्यकारी अभियंत्यांनी सूचना दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचे हे नवीन संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे ग्रामस्थांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.