महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी केली पोलिसांच्या समक्ष स्वाधीन

वागदेतील तरुणाचा प्रामाणिकपणा

कणकवली : कणकवली तालुक्यातील बावशी येथील दिव्यांग असलेल्या सचिन शशिकांत सावंत यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झाली होती. ही पिशवी वागदे येथील चंद्रकांत घाडीगावकर यांना सापडल्यानंतर त्यांनी ही कागदपत्रांसह ची पिशवी कणकवली पोलीस स्टेशन येथे जमा केली. त्यामुळे सचिन सावंत यांची सर्व कागदपत्रे सही सलामत त्यांच्या पुन्हा स्वाधीन झाली. कणकवली पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी श्रीमती राणे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कागदपत्रांची पिशवी सचिन सावंत यांच्या स्वाधीन करण्यात आली.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!