वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे समर कॅम्पचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार येथे दिनांक ४,५ आणि ६ मे रोजी १० ते १५ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळला.
दरवर्षी या कार्यशाळेचे आयोजन केले जाते मुलाना या कॅम्पचे बरेच फायदे होतात सुट्टीचा सदुपयोग कलाकृतीची निर्मिती यामुळे मुलांना विविध कलांची ओळख होते. या कार्यशाळेची सुरुवात ड्रॉईंग आणि पेंटिंग या उपक्रमाने केली. वारलीचित्र संकल्पचित्र अक्षरलेखन अशा विविध कलाप्रकार कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी करून घेतले एकूण तीन दिवसाची कार्यशाळा ठेवण्यात आली होती.
यामध्ये ड्रॉईंग, पोस्टर कलर पेंटिंग, पेपर क्राफ्ट, अक्षरगणेश, वारली पेंटिंग, कोलाज काम आणि मातीकाम अशा वैविध्यपुर्ण विषयांवर कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळेत एकूण अठरा विद्यार्थी सहभागी झाले. यासाठी मार्गदर्शक म्हणून पाट हायस्कूलचे कला शिक्षक श्री. संदिप साळसकर सर, श्रीम. चित्रा गुरव, श्री. योगेश येरम, श्री. सतिश नाईक हे उपस्थित होते. यावेळी श्रीम. रेणुका नागोळकर, सौ. नेहा नाईक, श्रीम. नमिता गावडे व सहकारी यांनी वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे सुत्रबद्ध नियोजन केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!