पाट हायस्कूलमध्ये ज्ञानेश सामंत यांच्या हस्ते नूतन अभ्यासिकेचे उद्घाटन

गुरु शिष्य परंपरा जपा !

ज्ञानेश सामंत यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी । कुडाळ : एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ ,पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट,कै . सौ. एस. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा डॉ. विलासराव देसाई उच्च महाविद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नूतन अभ्यासिकेचे उदघाटन फ्रान्समधील At Alcatle Lucent Enterprise या कंपनीचे डिजिटल इन्फॉर्मेशन डायरेक्टर ज्ञानेश विद्याधर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्था कार्यवाह सुधीर ठाकूर यांच्याआणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उद्योजक मनोज नाईक, राजेश सामंत , माडयाची वाडीचे मुख्याध्यापक बाळकृष्ण रावण, सुधीर ठाकूर ,महादेव टिक्का, तळवडेकर, सुभाष चौधरी, माजी विद्यार्थी शिंदे, दिगंबर सामंत, मंदार प्रभू, महादेव टिक्का सरांचे सर्व कुटुंबीय, तुषार आंबेरकर ,गुरुनाथ केरकर, विलास म्हापणकर ,संदीप साळसकर, सयाजी बोंदर,विजय मेस्त्री, राजन हंजनकर या सर्वांचे मुख्याध्यापक शामराव कोरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
ज्यांच्या बहुमूल्य देणगीतून अभ्यासिका सुरू करण्यात आली असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्ञानेश सामंत यांचा शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने कार्यवाह सुधीर ठाकूर व उद्योजक मनोज नाईक यांचा महादेव टिक्का यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पहिली पंचवीस वर्षे विद्यार्थ्यांनी विद्या ग्रहण केली पाहिजे नंतरच्या पंचवीस वर्षात ग्रहण केलेल्या विद्येचा वापर करून धनप्राप्ती केली पाहिजे आणि पुढील पंचवीस वर्षात विद्या व धन यांचा वापर करून पुण्य मिळविले पाहिजे ध्येयप्राप्तीसाठी मेहनत करा असा मौलिक संदेश कार्यक्रमाचे अतिथी मनोज नाईक यांनी दिला तरअभ्यासिका सज्ज झाली आहे आता विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या जास्तीत जास्त उपयोग करून आयुष्याचे कल्याण करून घ्या असे आवाहन श्री ज्ञानेश सामंत यांनी विद्यार्थ्यांना केले
. अभ्यासिकेसाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 5000 रुपये देणगी मुख्याध्यापक शामराव कोरे यांच्याकडे सुपूर्द केली. सी. एस .आर फंड मार्फत ज्ञानेश सामंत यांनी अभ्यासिकेसाठी तीन लाख रुपयाची देणगी मिळवून दिली. त्याबद्दल संस्थेमार्फत मी ऋण व्यक्त करतो .भावनिक, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे ऑनलाइन प्रशिक्षण देणारी आमची ही जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. आमची संस्था इतर शाळेतील संस्थेपेक्षा दहा वर्षे पुढचा वर्ष विचार करते व त्याची अंमलबजावणीही करते. आप्तस्वकीयांच्या प्रेमळ भावनेतून व्यक्त होणारे उत्कट प्रेम ही खरोखर हेवा वाटणारी बाब आहे. अशी सेवानिवृत्त शिक्षक टिक्का सरांच्या कुटुंबीयांची प्रशंसा अध्यक्षीय भाषणातून सुधीर ठाकूर यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, सूत्रसंचालन सौ.शीला सामंत व आभार पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!