नितेश राणे यांनी केलेला अपमान सहन न झाल्याने भरणी गावच्या सरपंचांसह सदस्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

राज ठाकरे यांची सभा सुरु असतानाच रात्री आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपला खिंडार
इंडिया आघाडी लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी केले स्वागत
कणकवली विधानसभा मतदारसंघातील भरणी गावातील सरपंच श्री अनिल बागवे हे निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यास आमदर नितेश राणे यांना भेटण्यास गेले असता त्यांना अपमानस्पद वागणूक मिळाल्याने व गावात विकासकामे होत नसल्याने शनिवार रात्री उशिरा त्यांनी आपल्या सदस्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी श्री अनिल बागवे यांच्यासह राधिका पाटकर, मनीषा तांबे, अक्षय गुरव, रमेश जगताप, मंगेश पालकर, प्रकाश बागवे आदी सदस्य व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना श्री विनायक राऊत यांनी सर्वांना आपल्या पक्षात आपुलकीने वागवले जाईल व उचित सन्मान राखत गावाच्या विकासासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित करण्यात आले. सदर प्रवेशाच्या वेळी पक्षाचे विधानसभा संपर्कप्रमुख सतीश सावंत, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, श्री रामू विखाळे, सुनील बागवे, विश्वनाथ दळवी, मोहन तांबे, संजय सावंत, गणपत गुरव आदी मान्यवर व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
कणकवली, प्रतिनिधी