उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ

५ मे ते ७ मे विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे,येथील मौजे कुंभारवाडी गावात सालाबादप्रमाणे या वर्षीही उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ,मुबई (रजि).व समस्त ग्रामस्थ मंडळ,कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वै. गुरुवर्य गणपत बाबा महाराज गुडेकर (अलिबागकर महाराज श्री क्षेत्र पंढरपूर) व वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे महाराज,(श्री क्षेत्र पंढरपूर) व वै.सदाशिव महाराज गांवकडकर,कुंभारवाडी यांच्या कृपाक्षेत्राखाली,आणि गुरुवर्य मा.नारायण दादा वाजे महाराज,(अलिबागकर, पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त रविवार ता.५ मे २०२४ ते मंगळवार ता.७ मे २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या प्रसंगी श्रीमद् ज्ञानेश्वरीवरील सामुदायिक पारायण,किर्तन,प्रवचन, भजन व महिलांसाठी हळदीकुंकू इ.कार्यकमाचे आयोजित करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी,माहेरवाशीनी व हितचिंतकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष वामनराव धामणकर यांनी प्रसिद्ध पत्रकात केले आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!